पौर्णिमेच्या रात्री पावसात चिंब चिंब भिजताना....
तुझ्या हर्षित यौवनास तृषार्त डोळ्यांनी बघताना !!
नकळतच मनातले प्रणय भाव नयनांत पोहचले....
तरीही, ह्या वेड्या मनाला मी अनेकदा रोखले !!
सुमधुर शांततेत अचानक एकच वीज कडाडली....
अन काही कळण्या आतच, तु माझ्या मिठीत आली !!
डोळे मिटले गेले... जेव्हा तुझा आर्त ओला स्पर्श झाला...
क्षणातच मनातील सारे भाव भस्म करुन गेला !!
न उरले अंतर, न उरली मर्यादा.. काही क्षणांसाठी,
कैक युगांचा विरह सोसला होता त्या एका भेटी साठी !!
-
प्र*
3:06 PM 10/13/2011
No comments:
Post a Comment