भाषा...
भाषा माझ्या डोळ्यांची.....
कधी कळली का नाही तुला ?
भाव माझ्या मनाचे......
कधी उमजले का नाही तुला ?
शब्द माझ्या कवितेचे.....
कधी समजले का नाही तुला ?
का तुला...
कळते भाषा....
फक्त ओठांचीच ???
जी...
मी...
अजून.....
वापरलेलीच नाही !!
शिघ्रकवी वैद्य प्र.प्र. व्याघ्रसूदन
२५ मे २००८ ६.१७ सायं