अशीच तीही विरून गेली....
सुमने प्राजक्ताची....
निघून गेलीस तु जशी.....
आयुष्याच्या.... सुगंधी संध्याकाळी !!
नियतिचा खेळ अजब......अजुनही नसे संपलेला ....
अजुनही... हवा येते....गात....मंजुळ गाणं !
जशी तु येत असे....!
अनं....नकळत जाते ...फुलांना देऊन ...अलगद धक्का !!
जशी तु जात असे ...!!
पण तु काही पुन्हा येत नाही ....
अनं माझी संध्याकाळ...
तुझ्या आठवणी शिवाय कधीही जात नाही....
प्रिये....तु ये.... !....अजुनही... तुझी वाट पहिली जाते...
मनातच साद घातली जाते !!
.....प्रिये तु ये...
माझ्या रुदित मनासाठी ये ....
नाहीतर ठेच लागलेल्या...... ह्या सुमनांसाठी ये !!!
फुले प्राजक्ताची....कधी होती तुझ्या ओठांची हासवे !
आता असती.......... माझ्या मनाची आसवे !!!
ये ...ये प्रिये !
ये आणि ही आसवे पुसून जा ....
काहीही बोलली नाहीस तरी चालेल ...फक्त एकदा पूर्वी सारखे हसून जा !!!
-
Vd.P.P.W.
शिघ्रकवी वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन
Search This Blog
Tuesday, September 14, 2010
Monday, August 2, 2010
दैवी प्रेम
अहंकार, स्वार्थ , द्वेष , राग , लोभ , मात्सर्य , भय , अकृतज्ञता यांनी मनात प्रवेश केला तर मनातले दैवी प्रेम स्वतः हूनच निघून जाते ! .
Vdppw
Vdppw
Wednesday, July 28, 2010
भविष्याला... भूतकाळातच गेला तडा !
भविष्याला... भूतकाळातच गेला तडा !
आत्ता वर्तमानही म्हणतो.... पुढे जाऊन रडा !
पायर्या झिजलेल्या मंदिरातला.... देवही आता माजला...
हात पसरले त्याच्या पुढे..तर तो ही पळावया धावला !!
११ जुन २००८ ११: ५६ रात्रौ
आत्ता वर्तमानही म्हणतो.... पुढे जाऊन रडा !
पायर्या झिजलेल्या मंदिरातला.... देवही आता माजला...
हात पसरले त्याच्या पुढे..तर तो ही पळावया धावला !!
११ जुन २००८ ११: ५६ रात्रौ
Monday, July 26, 2010
आजकाल स्नेहबंध शिथिल होऊ लागलेत...
आजकाल स्नेहबंध शिथिल होऊ लागलेत...
ओळख विसरलेत सगळे......स्वत:चीच,
तेंव्हा......इतरांबद्दल प्रश्नच नाही !
प्रश्नच अनुपस्थित !...तर मग...उत्तरांची सावरासावर तरी कशाला ?
दसरा असो की दिवाळी....
इकडे,अपरिचितांच्या शुभेच्छांचे ढीग लागलेत...
खरच आहे...आजकाल,
आपल्यातील स्नेहबंध शिथिल होऊ लागलेत !
-
शिघ्रकवी वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुद
साभार प्राप्ति : सचिन वाघमारे

१ उनाड आयुष्य जगाय़चय मला !
१ उनाड आयुष्य जगाय़चय मला !
करायचीय नुसती हाणामारी...
करायचीय प्रेमाच्या बाजारात शिरजोरी...
त्यासाठी,
हा जन्म लगेच संपावयाला आहे माझी तयारी !!
शिघ्रकवी वैद्य प्र.प्र.व्याघ्रसुदन
०८ डिसेंबर २००८ ११:५८ रात्रौ
करायचीय नुसती हाणामारी...
करायचीय प्रेमाच्या बाजारात शिरजोरी...
त्यासाठी,
हा जन्म लगेच संपावयाला आहे माझी तयारी !!
शिघ्रकवी वैद्य प्र.प्र.व्याघ्रसुदन
०८ डिसेंबर २००८ ११:५८ रात्रौ
१ कवी अडकलेला....
पावसाच्या मनात काय असत ?
ते कोणालाही माहीत नसतं...
पण मला कळत सार काही...
तो कधी कुठे पडेल... अन् कुठे नाही...!
आज अनेक दिवसांनी......... पाऊस पुन्हा आलाय...
त्याला पाहून मला सोडून इतर सगळ्य़ांनाच आनंद झालाय !!
सगळे खुष...त्यांना वाटातयं...तो परत आलाय...जाणार नाही!
सगळेच चुकले ...... तो केवळ तुझा निरोप घेऊन आलाय !!
तो काही फार वेळ रहाणार नाही...
तो अन् मी दोघेही आज रड रड रडलो...!
पण कोणाला काही कळलच नाही !
आपल्या मिलनाला त्याची,अन्...
त्याला आपल्या दोघांची इतकी सवय झालीयं....
की तो ही भावनांत गुरफटलेला ....!
कधी तुझ्या दारी,....
कधी माझ्या उरी.....
दिवस रात्र बरसलेला !!
इतके स्वार्थी प्रेम माझे...
आपल्या मिलनाला सदैव खुलवणारा तो...
मला उगाच वाटे...तो आपल्यात टपकलेला !!
खरं काय ते तो आज बोलला.....
.....
.....
खरे काय ते.... आता कळले....
गतजन्मीचा शापित प्रेमकवीच तो......विरहकाळी झुरलेला !
ह्या जन्मीचा....मेघदुत तो....
युगलमिलनी सदा हर्षित तो...अन् विरहातही न सरलेला !
निरोप तुझा तो घेऊन आला...
म्हणे,
"मित्रा....मलाच थोडा विलंब झाला....
प्राणाहुन हि तु प्रिय तिला...
प्रेमी आधि अन् मग कवी तु....
का उगाच........ काव्य विनोद केला ?
प्रियेचा रुसवा........ कमी का होता..?
त्यात तुझ्या.... मुद्रारक्षसाने कोप केला !!
माझा अनुभव न येवो तुला.....,
गतजन्मीचा प्रेम कवी मी....
कालबंधनात अडकलेला.!
तिच्या विरहात ह्या जन्मी ही....
रानो-पानी विजेप्रमाणे तडकलेला !!"
ऐकुन त्याची आर्त कहाणी...
हा शीघ्रकवी ही शब्दबंधनात अडकलेला !
तुझ्या प्रतिसादा अभावी....
आकाशातल्या विजेप्रमाणे......मनामध्ये तडकलेला !
हे जीवन सुंदर आहे...
त्याची सुंदरता डोळ्यांनी पाहून,
मनात समजून कळत नाही...त्याला संवाद साधावा लागतो...!!
०३ सप्टेंबर २००८ १२:०३ रात्रो

Saturday, July 24, 2010
कुंपणांच्या भिंती !
आम्ही जाणून आहोत.. घराच्या कुंपणांच्या भिंती !
कोण ओलांडू पहातो ..कोण आतची रहातो !!
कोण फळेची चाखतो...कोण पाणीच घालतो !
कोण घरीच झोपतो..कोण उन्हात राबतो !!!
शीघ्रकवी वैद्य प्र प्र व्याघ्रसुदन
२० जुलै २०१०
कोण ओलांडू पहातो ..कोण आतची रहातो !!
कोण फळेची चाखतो...कोण पाणीच घालतो !
कोण घरीच झोपतो..कोण उन्हात राबतो !!!
शीघ्रकवी वैद्य प्र प्र व्याघ्रसुदन
२० जुलै २०१०
चंद्र
चंद्र दूर असतो आणि तो आपल्याला हवा हवा सा आणि खुप लोभसवाणा वाटत असतो.....
.आणि मग नकळत.... दिवसा उजेडात अनेक गोष्टीत रमणारे आपले मन रात्रीची वाट पाहू लगते...
दररोज वृद्धिंगत होणारी चन्द्रकोर आणि मग पौर्णिमेच्या रात्री दिसणारा परिपूर्ण चंद्र...
सारे सारे काही आपल्या मनाला भावणारे असते... आणि मग आपण स्वप्न रंगवू लागतो ..
.ते स्वप्न कोणी तरी ऐकावे- पहावे; आणि कोणी तरी त्याचा अनुभव घ्यावा असे वाटू लागते...
आणि मग आपण शोधू लागतो असे कोणी.... ज्याला ही तो चंद्र दिसेल... आवडेल आणि तो ही आपल्या आनंदात रममाण होईल! ...
त्या चंद्राचा हा मनावरचा परिणाम फार सुंदर असतो!...
मग हळू हळू मनाला सवय होते...१-१ प्रियजण अजुन जमवण्याची ...
अंधारात ही कुणाला तरी शोधण्याची.....
मैत्री करण्याची !!
८ जुन २०१०

हसत-रडत
आग लागलेले दोन जीव....पावसात भिजत होते....
कोणालाच नाही कळले...
ओठ तेवढे हसत होते..पण डोळे मात्र रडत होते !!!
२३ जुलै २०१० शुक्रवार
सानपाडा;न.मुं.
कोणालाच नाही कळले...
ओठ तेवढे हसत होते..पण डोळे मात्र रडत होते !!!
२३ जुलै २०१० शुक्रवार
सानपाडा;न.मुं.
माझा आनंद अबाधित आहे...
असं समजू नका की मस्त पाऊस पडतोय.......
कुठेतरी विज पण कडाडत आहे !
मी गाण गातोय म्हणजे मी दुःखी नाही असं नाही...
पण ऊन असो वा पाऊस.... माझा आनंद अबाधित आहे !!
..हे खरयं...स्वार्थी माणसांचा सुळसुळाट झालाय नुसता......
श्वास घेण ही पाप होऊन बसलय त्यांच्या मध्ये.......
आणि त्यात हा पाऊस.... भरत आलेल्या जखमा पुन्हा चिघळवतो आहे !
...आज ही कोणाला तरी.... माझा जीवनातला आनंद बघवत नाही....
पण...समाधान एवढच आहे की माझा आनंद अबाधित आहे !
- शीघ्रकवी वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन

मी तुझा प्रेमी आहे !!
मी आंधळा आहे !
मी चोर आहे !
मी निस्वार्थी आहे !
मी वेडा आहे !
मी दुष्ट आहे !
मी एकमेव आहे !
मी अपराजीत आहे !
हो....
असं तर ती नेहमीच म्हणते ...
पण मला तीला सांगाव लागत..प्रिये मी तुझा प्रेमी आहे !!
मी चोर आहे !
मी निस्वार्थी आहे !
मी वेडा आहे !
मी दुष्ट आहे !
मी एकमेव आहे !
मी अपराजीत आहे !
हो....
असं तर ती नेहमीच म्हणते ...
पण मला तीला सांगाव लागत..प्रिये मी तुझा प्रेमी आहे !!
स्वप्ननगरीतील सायंकाळ
कृष्णमेघांतून झिरपती.... सोनेरी सुर्यकिरणे...
मंदोष्म्याने वितळती बर्फाच्छादीत उत्तुंग हिमशिखरे...
स्वतःच्याच धुंदीत फिरे... शीळ घालीत मादक गंधीत वारे..
घनदाट धुक्यांनी भरे....हिरवेगार दरी-खोरे..
उंच पर्वतांवरून भिरकून देती स्वतःस अवखळ बेदुंध झरे...
अशा स्वप्ननगरीतल्या..एका मोहक सायंकाळी!
अवचित येता तीने... इंद्रधनुच मग खुलावे जळी!!
शिघ्रकवी वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन
मंदोष्म्याने वितळती बर्फाच्छादीत उत्तुंग हिमशिखरे...
स्वतःच्याच धुंदीत फिरे... शीळ घालीत मादक गंधीत वारे..
घनदाट धुक्यांनी भरे....हिरवेगार दरी-खोरे..
उंच पर्वतांवरून भिरकून देती स्वतःस अवखळ बेदुंध झरे...
अशा स्वप्ननगरीतल्या..एका मोहक सायंकाळी!
अवचित येता तीने... इंद्रधनुच मग खुलावे जळी!!
शिघ्रकवी वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन
तहानलेल्या कोणीतरी...
तहानलेल्या कोणीतरी...
खोल खोल विहरित डोकवाव!
अन ओंजल भर पाण्यासाठी....
आपणच एक टिपूस गालाव !!१!!
तहानलेल्या कोणीतरी.....
आकाशाकडे पाहत रहाव!
शुष्क रुक्ष ढगांना पाहून...
ओल्या डोळ्यांनी गात रहाव...!!२!!
तहानलेल्या कोणीतरी....
देवाच्या नावाने फोडावी आरोळी!
कदाचित तोही असेल कोरडा..
जन्म-मृत्युच्या कातरवेळी !!३!!
तहानलेल्या कोणीतरी....
सुर्याच्या नजरेत रोखावी नजर!
म्हानाव ....तूच काय तो संतापलेला....?
अन मग...त्यालाही बसावी जबर !!४!!
तहानलेल्या कोणीतरी ...
मग...अमृताचेच पान करावे...!
मृत्यूची हि ओंजल भरावी...
अन आयुष्याचे दान द्यावे...!!५!!
-वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन
खोल खोल विहरित डोकवाव!
अन ओंजल भर पाण्यासाठी....
आपणच एक टिपूस गालाव !!१!!
तहानलेल्या कोणीतरी.....
आकाशाकडे पाहत रहाव!
शुष्क रुक्ष ढगांना पाहून...
ओल्या डोळ्यांनी गात रहाव...!!२!!
तहानलेल्या कोणीतरी....
देवाच्या नावाने फोडावी आरोळी!
कदाचित तोही असेल कोरडा..
जन्म-मृत्युच्या कातरवेळी !!३!!
तहानलेल्या कोणीतरी....
सुर्याच्या नजरेत रोखावी नजर!
म्हानाव ....तूच काय तो संतापलेला....?
अन मग...त्यालाही बसावी जबर !!४!!
तहानलेल्या कोणीतरी ...
मग...अमृताचेच पान करावे...!
मृत्यूची हि ओंजल भरावी...
अन आयुष्याचे दान द्यावे...!!५!!
-वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन
"आज तुला मी नको आहे"
आज..... तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं !
तुझ्या बोलण्यातील........स्वार्थीपणा दुखावतोय....
आणि तु केलेल्या माझ्या भावनांच्या उपहासाने.... माझ मन जळतय !!
एक दिवस असा होता......जेंव्हा तु माझ्या साठी झुरायचीस...
माझा प्रत्येक शब्द,....... तु फुलासारखा जपायचीस !
माझा आवाज एकदा ऍकण्यासाठी.... तासन तास वाट बघायचीस !
कानात प्राण आणुन...... दिवस-रात्र....माझ्या्च स्वप्नांत रमायचीस !!
पण आज का कोण जाणे....?...... हे सारच बदलल !
माझं असं काय चुकलं... की......तुझं माझ्यावरचं प्रेमचं आटल ?
मला जे समजायच........... ते मी समजल आहे,
"आज तुला मी नको आहे" !!!.......हे तुझ्या वागण्यावरुन उमगल आहे !
तरी त्यात तुझं सुख असेल...तर माझी काही हरकत नाही !
तु सुखी होणार असशील तर...मरणालाही माझा नकार नाही !!
पण तरीही...... मनात कुठे तरी असं वाटतयं....
तुला......कधीतरी.......माझी आठवण नक्की येईल !
मला एकदा भेटण्यासाठी.......तुझं चंचल मन आतुर होईल !!
पण तेंव्हा........ तुला सावरायला..... मी ह्या जगात असणार नाही.....
कारण तुझ्यापासुन दुर राहुन......मी जास्त दिवस जगणार नाही !!

Subscribe to:
Posts (Atom)