असं समजू नका की मस्त पाऊस पडतोय.......
कुठेतरी विज पण कडाडत आहे !
मी गाण गातोय म्हणजे मी दुःखी नाही असं नाही...
पण ऊन असो वा पाऊस.... माझा आनंद अबाधित आहे !!
..हे खरयं...स्वार्थी माणसांचा सुळसुळाट झालाय नुसता......
श्वास घेण ही पाप होऊन बसलय त्यांच्या मध्ये.......
आणि त्यात हा पाऊस.... भरत आलेल्या जखमा पुन्हा चिघळवतो आहे !
...आज ही कोणाला तरी.... माझा जीवनातला आनंद बघवत नाही....
पण...समाधान एवढच आहे की माझा आनंद अबाधित आहे !
- शीघ्रकवी वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन
No comments:
Post a Comment