तहानलेल्या कोणीतरी...
खोल खोल विहरित डोकवाव!
अन ओंजल भर पाण्यासाठी....
आपणच एक टिपूस गालाव !!१!!
तहानलेल्या कोणीतरी.....
आकाशाकडे पाहत रहाव!
शुष्क रुक्ष ढगांना पाहून...
ओल्या डोळ्यांनी गात रहाव...!!२!!
तहानलेल्या कोणीतरी....
देवाच्या नावाने फोडावी आरोळी!
कदाचित तोही असेल कोरडा..
जन्म-मृत्युच्या कातरवेळी !!३!!
तहानलेल्या कोणीतरी....
सुर्याच्या नजरेत रोखावी नजर!
म्हानाव ....तूच काय तो संतापलेला....?
अन मग...त्यालाही बसावी जबर !!४!!
तहानलेल्या कोणीतरी ...
मग...अमृताचेच पान करावे...!
मृत्यूची हि ओंजल भरावी...
अन आयुष्याचे दान द्यावे...!!५!!
-वैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदन
No comments:
Post a Comment