इथे जाती-पातीची ही करतात शेती...
अनं.. माणुसकीला देतात मुठमाती !!
अश्याच आहेत इथल्या...चालीरीती..
इथे कुंपणांनाच वाटते शेताची भिती !!
-
प्र*
( अ ज ब ज ग )
11:09 PM 10/13/2011
Search This Blog
Thursday, October 13, 2011
मरणानुभव
मरणाच्या दारात, दररोज... उधारीच आयुष्य...... जगताना...
आतल्या आत, तीळ तीळ मरण्याचा.... अनुभव गुढ होता !
आणि जेव्हा मरण जवळ आलं....तेव्हा ही, त्या जीवनाला,
तीतक्याच प्रेमाने हसत बघण्याचा.....अनुभव गोड होता !!
-
प्र*
11:06 PM 10/4/2011
आतल्या आत, तीळ तीळ मरण्याचा.... अनुभव गुढ होता !
आणि जेव्हा मरण जवळ आलं....तेव्हा ही, त्या जीवनाला,
तीतक्याच प्रेमाने हसत बघण्याचा.....अनुभव गोड होता !!
-
प्र*
11:06 PM 10/4/2011
प्रेम काळजी
प्रेम करताना कोणाची तरी काळजी आपोआपच होते....
काळजी करताना प्रेम होत नाही असे क्वचितच होते !!
-
प्र*
11:04 PM 10/1/2011
काळजी करताना प्रेम होत नाही असे क्वचितच होते !!
-
प्र*
11:04 PM 10/1/2011
न शि ब
हस्ततलावर नशिबाची रेख...
की ललाटावर सटवाईचा लेख ?
ग्रहतार्यांच गणिती ज्योतिष...
की पूजापाठाच देवाला अमिष ?
सत्य काय ? असत्य काय ?
कर्तृत्वाला नशिबाला चौकट !
देव काय ? मानव काय ?... इथे..
नशिबही नाही मिळत फुकट !!
-
प्र*
(अ ज ब ज ग)
10:04 AM 10/7/2011
की ललाटावर सटवाईचा लेख ?
ग्रहतार्यांच गणिती ज्योतिष...
की पूजापाठाच देवाला अमिष ?
सत्य काय ? असत्य काय ?
कर्तृत्वाला नशिबाला चौकट !
देव काय ? मानव काय ?... इथे..
नशिबही नाही मिळत फुकट !!
-
प्र*
(अ ज ब ज ग)
10:04 AM 10/7/2011
फुलपाखरु
दिवसभर उडणारं.... हे फुलपाखरु...
आता दमले आहे...
निपचित...बिछान्यावर...पडलं आहे !!!
नाना रंगात...स्वतःला ही विसरणारे ते....
आता स्वतःतच रमले आहे !!
कारण ही तसेच आहे....
त्याचे मोहाचे पाश आता तुटले आहे....
त्याच्या आवडत्या रातराणी ने ....
आज त्याला दूर लोटले आहे..!!!
खरचं...तीला भेटण्याच्या आशेवर...
दिवसभर अविरत उडणारे ...फुलपाखरु...
अंधारात एकटेच पडले आहे !....
कोणालाही न दिसता.....मौन रडले आहे !!
ज्या मधुगंधासाठी काढला घाम....
त्यानेच त्याला आज छळले आहे !!
स्वतःतलाही न दिसे "राम"
असे काही तरी आज घडले आहे !!!
sk ppw
-
२ मार्च २००८ १२:११ प्रातः
आता दमले आहे...
निपचित...बिछान्यावर...पडलं आहे !!!
नाना रंगात...स्वतःला ही विसरणारे ते....
आता स्वतःतच रमले आहे !!
कारण ही तसेच आहे....
त्याचे मोहाचे पाश आता तुटले आहे....
त्याच्या आवडत्या रातराणी ने ....
आज त्याला दूर लोटले आहे..!!!
खरचं...तीला भेटण्याच्या आशेवर...
दिवसभर अविरत उडणारे ...फुलपाखरु...
अंधारात एकटेच पडले आहे !....
कोणालाही न दिसता.....मौन रडले आहे !!
ज्या मधुगंधासाठी काढला घाम....
त्यानेच त्याला आज छळले आहे !!
स्वतःतलाही न दिसे "राम"
असे काही तरी आज घडले आहे !!!
sk ppw
-
२ मार्च २००८ १२:११ प्रातः
मनमंदिर
होऊन ही निराशा घोर .... थोडी आशा अजून आहे !
अंधारलेल्या मन मंदिरी .... एक काजवा लपून आहे !! धृ॰ !!
-
प्र*
10:59 PM 10/7/2011
झाले जरी मुक्त सारे........थोडी चिंता अजून आहे...
मनमंदिराच्या कोनार्यात..... एक बंदी अजून आहे !!
-
प्र*
October 7 at 11:28pm
अंधारलेल्या मन मंदिरी .... एक काजवा लपून आहे !! धृ॰ !!
-
प्र*
10:59 PM 10/7/2011
झाले जरी मुक्त सारे........थोडी चिंता अजून आहे...
मनमंदिराच्या कोनार्यात..... एक बंदी अजून आहे !!
-
प्र*
October 7 at 11:28pm
दिवाळीची सुट्टी
दिवाळीच्या सुट्टीत...
आम्हां मज्जा येते फार...
बाबा देतात नवे कपडे
अनं आई करते फराळ !! ॥ धृ॰ ॥
- ब ड ब ड गी ते
प्र*
3:08 PM 10/8/2011
कंदिल बनवणारे आम्ही...
किल्ल्यांचे बाल शिलेदार !!
छान छान छान...
दिवाळीच्या सुट्टीत...
आम्हा मजा येते फार !!
-
प्र*
October 8 at 8:21pm
आम्हां मज्जा येते फार...
बाबा देतात नवे कपडे
अनं आई करते फराळ !! ॥ धृ॰ ॥
- ब ड ब ड गी ते
प्र*
3:08 PM 10/8/2011
कंदिल बनवणारे आम्ही...
किल्ल्यांचे बाल शिलेदार !!
छान छान छान...
दिवाळीच्या सुट्टीत...
आम्हा मजा येते फार !!
-
प्र*
October 8 at 8:21pm
भिक्षुकी वैद्यकी
मी निघालो मागत भिक्षा....
सुरु झाली ही अग्निपरिक्षा......
-
प्र*
मागितली जेव्हा माधुकरी..
तेव्हा कळले वैद्यकीच बरी !!
-
प्र*
October 9 at 11:12pm
सुरु झाली ही अग्निपरिक्षा......
-
प्र*
मागितली जेव्हा माधुकरी..
तेव्हा कळले वैद्यकीच बरी !!
-
प्र*
October 9 at 11:12pm
राजा भिकारी
फकीरीचा थाट भारी.......
राजापेक्षा खुशीत भिकार !!
राजाला चिंतेचे सरण.....
फकीराला नभाचे कफन !!
-
प्र*
10 OCT 2011 Monday at 11:50am
राजापेक्षा खुशीत भिकार !!
राजाला चिंतेचे सरण.....
फकीराला नभाचे कफन !!
-
प्र*
10 OCT 2011 Monday at 11:50am
ला ई ट
तुमची......... पण गेली ?
आमची...... पण गेली ?
म्हणजे... सर्वांचीच गेली !
मग येईल...... लवकरच !!
( आणला हिने वीट ती ला ई ट )
-
प्र*
5:41 PM 10/10/2011
आमची...... पण गेली ?
म्हणजे... सर्वांचीच गेली !
मग येईल...... लवकरच !!
( आणला हिने वीट ती ला ई ट )
-
प्र*
5:41 PM 10/10/2011
लोक येथे
गुन्हेगारास पकडून.... पोसतात लोक येथे...
परदेशी कारवायांना.... फसतात लोक येथे...
-
प्र*
(क्रमशः)
१० ऑक्टो २०११ Monday at 11:15pm near Vashi, India
परदेशी कारवायांना.... फसतात लोक येथे...
-
प्र*
(क्रमशः)
१० ऑक्टो २०११ Monday at 11:15pm near Vashi, India
हिंदुत्वाचा भ्रांत
भारतमातेचे चारही सिंह शांत आहेत...
तोपर्यंत हिंदूत्वाचा आम्हास भ्रांत आहे !
-
प्र*
१० ऑक्टोबर २०११ Monday at 11:03pm near Vashi, India
तोपर्यंत हिंदूत्वाचा आम्हास भ्रांत आहे !
-
प्र*
१० ऑक्टोबर २०११ Monday at 11:03pm near Vashi, India
गर्दभगीता
एकदा गर्दभां समक्ष गीता पठणाचा कार्यक्रम होता...
सर्व गर्दभच श्रोते होते अनं गायक ही गर्दभ च होता !!
संस्कारीत* प्र**
10-OCT-2011 Monday at 8:52pm
सर्व गर्दभच श्रोते होते अनं गायक ही गर्दभ च होता !!
संस्कारीत* प्र**
10-OCT-2011 Monday at 8:52pm
रोहिणीरमण
इंद्रेच्छा
मनावरची..... मळभ... मदिरापानानेही न उतरली !!
उत्तरेसाठीची....उत्कंठा... उत्कर्षानेही न भागली !!
इंद्राची......इच्छा.....इंद्रायणीनेच......मग पुरवली !!
-
प्र*
( इं द्रा य णी )
12:43 PM 10/11/2011
उत्तरेसाठीची....उत्कंठा... उत्कर्षानेही न भागली !!
इंद्राची......इच्छा.....इंद्रायणीनेच......मग पुरवली !!
-
प्र*
( इं द्रा य णी )
12:43 PM 10/11/2011
कृ ष्णा ली
कौरवांच्या द्यूतसभेत...... पांडवांचे शिर नग्न झाले !!
द्रौपदीचे होता वस्रहरण... त्यांचे पौरुषही भग्न झाले !!
करुनही "भीम" प्रतिज्ञा....ती पांचाली निर्शील झाली !!
होताच प्रिय अर्जुनसखा.... म्हणून लाज राखली गेली !!
-
प्र*
12:51 PM 10/11/2011
( कृ ष्णा ली )
द्रौपदीचे होता वस्रहरण... त्यांचे पौरुषही भग्न झाले !!
करुनही "भीम" प्रतिज्ञा....ती पांचाली निर्शील झाली !!
होताच प्रिय अर्जुनसखा.... म्हणून लाज राखली गेली !!
-
प्र*
12:51 PM 10/11/2011
( कृ ष्णा ली )
वनवास मोक्ष
संसाराचा वनवास सायंकाळी का सोसावा ?
जन्मदात्या पित्यास पुत्रच पुर्ण विसरावा ?
ऐसे होण्यापेक्षा वानप्रस्थ का न स्विकारावा ?
संसारातच अडकल्यास मोक्ष कधी मिळवावा ??
-
प्र*
( सर्व वृद्ध मात्या पित्यांनी नातवांचे तोडं पाहून २-३ वर्ष मजेत घालवून.... मोक्ष प्राप्ती साठी वानप्रस्थ स्विकारुन एकांतात जाणे अपेक्षित किंवा चार धाम यात्रेस जाणे अपेक्षित परंतु अश्या प्रकारे मोहमायेपासून दूर न गेल्याने दुःख प्राप्त होत आहे... ऐसे करण्याने मानव जन्माचे प्रयोजन साध्य होऊ शकते...
अन ऐसे न करण्याने नरक यातना भूतलावरच सुरु होतात....
तात्पर्य. => संसारात रमून न जाता पाय काढता घ्यावा असा शास्रादेश आहे !!)
12 Oct 2011 Tuesday at 7:27pm · Like

शरदचंद्रासवे..जागर
ओढून आठवणींच्या शीतल चांदण्यांची चादर......
शरदचंद्रासवे पुसण्या घातला का तिने जागर !!
-
प्र*
१२ ऑक्टो २०११ Tuesday at 8:11pm
शरदचंद्रासवे पुसण्या घातला का तिने जागर !!
-
प्र*
१२ ऑक्टो २०११ Tuesday at 8:11pm
सौंदर्य
शरद पौर्णिमेच्या रात्रीला.... तीच्या अंगणातला प्राजक्त..... भलताच मोहरला....
चंद्रप्रकाशात..... तीचे सौंदर्य न्याहाळायला..... एक एक फुलाचा जीव आतुरला !!!
-
प्र*
8:31 PM 10/11/2011
चंद्रप्रकाशात..... तीचे सौंदर्य न्याहाळायला..... एक एक फुलाचा जीव आतुरला !!!
-
प्र*
8:31 PM 10/11/2011
अंधार
पाहूनी दिवसा दाटलेला अंधार.....वाटे ग्रहण लागेल स्वातंत्र्यसुर्याला....
कधी पडेल हे भ्रष्ट सरकार ?....... हाच प्रश्न आज येथे प्रत्येकाला !!!
-
प्र*
1:31 PM 10/13/2011
कधी पडेल हे भ्रष्ट सरकार ?....... हाच प्रश्न आज येथे प्रत्येकाला !!!
-
प्र*
1:31 PM 10/13/2011
चंद्र
उत्कट प्रेमाचे प्रतिक असलेला चंद्र.... चराचरांस, लावण्याने मंत्रमुग्ध करु लागला....
अवनीच्या सन्निकर्षात आल्यावर.....शारदरात्री, सर्वदिशांतून सोमरस वाहू लागला !!
-
प्र*
9:27 PM 10/11/2011
अवनीच्या सन्निकर्षात आल्यावर.....शारदरात्री, सर्वदिशांतून सोमरस वाहू लागला !!
-
प्र*
9:27 PM 10/11/2011
MSEB चे डोहाळे
आता घर्मबिंदुं... ही साचू लागले....
स्वेदकुपे ओथंबून.... वाहू लागले....
जाहले इतकेच होते....
MSEB ला पुन:.... डोहाळे लागले !!
-
प्र*
5:47 PM 10/10/2011
स्वेदकुपे ओथंबून.... वाहू लागले....
जाहले इतकेच होते....
MSEB ला पुन:.... डोहाळे लागले !!
-
प्र*
5:47 PM 10/10/2011
चंद्र-इंद्र
शरद पौर्णिमेची रात्र अती सुंदर दिसणार होता चंद्र.....
सौंदर्याचा मत्सर झाला.. म्हणूनच क्रोधला तो इंद्र !!
its raining (((heavenly)))) in pune :P
-
प्र*
१२ ऑक्टो २०११ Tuesday at 9:05pm
सौंदर्याचा मत्सर झाला.. म्हणूनच क्रोधला तो इंद्र !!
its raining (((heavenly)))) in pune :P
-
प्र*
१२ ऑक्टो २०११ Tuesday at 9:05pm
चंद्र
आज आकाशात "चंद्र ही नाही अनं चांदणे ही नाही" !!!
"तूच पौर्णिमेचा चंद्र " असे आता सांगणे ही नाही !!!
-
प्र*
11:38 PM 10/11/2011
"तूच पौर्णिमेचा चंद्र " असे आता सांगणे ही नाही !!!
-
प्र*
11:38 PM 10/11/2011
अबोला
ऐसी शारद रमण रजनी, पण कोठे हरवलीस सजनी !!
आली्स करुन चंदेरी शृंगार, गेली्स छेडून मनाची तार !!
अंबरी अदृश्य शशी , नलास सोडून गेली दमयंती जशी !!
सांग प्रिये का धरी हा अबोला , रुसलीस का तु हे चंचला !!
-
प्र*
9:06 PM 10/12/2011
आली्स करुन चंदेरी शृंगार, गेली्स छेडून मनाची तार !!
अंबरी अदृश्य शशी , नलास सोडून गेली दमयंती जशी !!
सांग प्रिये का धरी हा अबोला , रुसलीस का तु हे चंचला !!
-
प्र*
9:06 PM 10/12/2011
॥ मी ॥
॥ मी ॥
दुष्ट जगापासून रुष्टलो मी !
माझ्याच शब्दांत नष्टलो मी !!
असे मी मी करता कष्टलो मी !!
ओळखल का ? असा मी असामी !!
-
प्र*
11:03 PM 10/12/2011
दुष्ट जगापासून रुष्टलो मी !
माझ्याच शब्दांत नष्टलो मी !!
असे मी मी करता कष्टलो मी !!
ओळखल का ? असा मी असामी !!
-
प्र*
11:03 PM 10/12/2011
ए भाऊ.... गालिब
ए....भाऊ...
आम्हीही केली शायरी....
आम्ही ही मुशायर्यात गेलो...
पण लैला लैला करत गायलो नाही !!
उर्वशी-रंभा कित्येक आल्या....
गालिब होतो....गालिबच राहिलो...
मजनू सारखे मूसु मूसु रडलो नाही !!
-
प्र*
:P
१२ ऑक्टोबर २०११ मध्यान्म ११ वाजता
आम्हीही केली शायरी....
आम्ही ही मुशायर्यात गेलो...
पण लैला लैला करत गायलो नाही !!
उर्वशी-रंभा कित्येक आल्या....
गालिब होतो....गालिबच राहिलो...
मजनू सारखे मूसु मूसु रडलो नाही !!
-
प्र*
:P
१२ ऑक्टोबर २०११ मध्यान्म ११ वाजता
ओल्या शब्दांची एक कविता
बघता बघता आला ह्या वर्षीचा शेवटचा पाऊस.....पण राहून गेली अनेक वर्षांपासूनची माझी एक हौस !!
मला ओल्या शब्दांनी एक कविता करायची होती...अनं पाऊसात भिजताना तुला ती भेट द्यायची होती !!
-
प्र*
9:25 PM 10/12/2011
मला ओल्या शब्दांनी एक कविता करायची होती...अनं पाऊसात भिजताना तुला ती भेट द्यायची होती !!
-
प्र*
9:25 PM 10/12/2011
शब्द भावना अबोला
शब्दांच्या सौंदर्याला.. भावनांचा चढवीता मी साज !
तुझ्या अबोल प्रेमालाही...बघ वाचा फुटली आज !!
-
प्र*
12:16 PM 10/11/2011
तुझ्या अबोल प्रेमालाही...बघ वाचा फुटली आज !!
-
प्र*
12:16 PM 10/11/2011
रु प ग र्वि ता
॥ रु प ग र्वि ता ॥
सौंदर्याचा माज..... तारुण्याची नशा...
बिनधास्त बाज..... संस्कारांचा हशा...
स्वैर...चौफेर....उधळलेला मनोरथ...
निशदिन... विषय-सेवनात महारत !
स्वातंत्र्याच्या खुंटीवर...*..सुशील वस्रे.. ( * = टांगून )
निर्वस्रांच्या गर्दीत... खोटे चेहरे हसरे !!
रात्रंदिन शब्दच्छलाचे संवाद गोजिरे...
न कळे, कोणते मुखडे, कोणते अंतरे !!
नात्यांची खाती...काही चालू काही बंद...
भावना शून्यच पण मद-मत्सरात धुंद !!
अंगलट करणारे... स्तुतिपाठक मित्र...
कवीकुंचल कृत हे.... रुपगर्वितेचे चित्र !!
-
प्र*
1:30 PM 10/11/2011
( रु प ग र्वि ता )

दुःख
आटले दुःख मज मनी मी सुख ही इतुके भोगले !
दाटले अश्रु नयनी जेव्हां मेघांना बरसावे लागले !!
-
प्र*
6:03 PM 10/12/2011
दाटले अश्रु नयनी जेव्हां मेघांना बरसावे लागले !!
-
प्र*
6:03 PM 10/12/2011
मनाचे सौंदर्य
मनाचे सौंदर्य.... कवितेचा आरसा...अनं...शब्दरुपी प्रतिमा !!
-
प्र*
12 Oct 2011 Tuesday at 7:05pm near Vashi, India
-
प्र*
12 Oct 2011 Tuesday at 7:05pm near Vashi, India
शब्दही भांडतात....
आजकाल..... कवितेत यायला...... शब्दही भांडतात,.... एकमेकांशी.... मनामध्येच माझ्या !!!
पुर्वी.... सगळेच अबोला धरुन होते,... असे काही झाले.... तुझ्या येण्याने...जीवनात माझ्या !!!
-
प्र*
11:54 AM 10/11/2011
( ह्र द्र व )
पुर्वी.... सगळेच अबोला धरुन होते,... असे काही झाले.... तुझ्या येण्याने...जीवनात माझ्या !!!
-
प्र*
11:54 AM 10/11/2011
( ह्र द्र व )
॥ बोली भावनांची ॥
केल्या चुका जरी सार्यांनी.... तरी.... मी चुकणार नाही !
माझ्या वाट्याची दुःखे....मी.... इतरांना विकणार नाही !!
टप्याटप्या वरती... आहेत थोर येथे.... दुःखाचे व्यापारी....
सुखाबदल्यात घेती दुःखे...करती पाप-पुण्याची दलाली !!
धावत येतील पहा सारे...होता चाहूल, कोणा दुःखिताची...
देतील आशिर्वाद....अनं वचने.....लावून बोली भावनांची !!
-
प्र*
6:40 PM 10/10/2011

शरद
शरदातल्या,
एका रखरखत्या दुपारी...
टेकडामागच्या माळावर...
एका वृक्षाच्या सावलीत....
एक माऊली निवांत विसावली....!!
-
प्र*
1:42 PM 10/10/2011
प्रतिकात्मक i.e. रुपक अलंकार !!
शरद ऋतु = शोषणकालाचे प्रतिक ( कलियुग )
रखरखती दुपार = तीव्र परिक्षेचा काल
टेकडी = महत प्रयास
माळ = स्थिर जीवन काल
एक वृक्ष = देव
सावली = देवकृपा
एक माऊली = सात्विक प्रेमळ व्यक्ती
निवांत विसावली = मनःशांती प्राप्त होऊन विश्राम केला.

रुपरञ्जन
माझ्या कवितांना...उत्स्फुर्त शब्दांचे कोंदण !!
त्या शब्दांना... अलंकाराचे आंदण !!
अनं अलंकारांना भावार्थाचे लिंपन !!
सर्व भावार्थात.....भावनांचे सिंचन !!
अनं भावनांना आठवणींचे विरजण !!
त्या आठवणींत............ फक्त तुझेच चिंतन !!
होय.....
माझी कविता म्हणजे......" तुझेच रुपरञ्जन !! "
-
प्र*
8:36 PM 10/8/2011

पौर्णिमेची रात्र.....
पौर्णिमेच्या रात्री पावसात चिंब चिंब भिजताना....
तुझ्या हर्षित यौवनास तृषार्त डोळ्यांनी बघताना !!
नकळतच मनातले प्रणय भाव नयनांत पोहचले....
तरीही, ह्या वेड्या मनाला मी अनेकदा रोखले !!
सुमधुर शांततेत अचानक एकच वीज कडाडली....
अन काही कळण्या आतच, तु माझ्या मिठीत आली !!
डोळे मिटले गेले... जेव्हा तुझा आर्त ओला स्पर्श झाला...
क्षणातच मनातील सारे भाव भस्म करुन गेला !!
न उरले अंतर, न उरली मर्यादा.. काही क्षणांसाठी,
कैक युगांचा विरह सोसला होता त्या एका भेटी साठी !!
-
प्र*
3:06 PM 10/13/2011

Subscribe to:
Posts (Atom)