Search This Blog

Thursday, October 13, 2011

रु प ग र्वि ता

॥ रु प ग र्वि ता ॥

सौंदर्याचा माज..... तारुण्याची नशा...
बिनधास्त बाज..... संस्कारांचा हशा...

स्वैर...चौफेर....उधळलेला मनोरथ...
निशदिन... विषय-सेवनात महारत !

स्वातंत्र्याच्या खुंटीवर...*..सुशील वस्रे.. ( * = टांगून )
निर्वस्रांच्या गर्दीत... खोटे चेहरे हसरे !!

रात्रंदिन शब्दच्छलाचे संवाद गोजिरे...
न कळे, कोणते मुखडे, कोणते अंतरे !!

नात्यांची खाती...काही चालू काही बंद...
भावना शून्यच पण मद-मत्सरात धुंद !!

अंगलट करणारे... स्तुतिपाठक मित्र...
कवीकुंचल कृत हे.... रुपगर्वितेचे चित्र !!

-
प्र*
1:30 PM 10/11/2011

( रु प ग र्वि ता )

No comments:

Post a Comment