Search This Blog

Thursday, July 15, 2021

भाषा...

भाषा... भाषा माझ्या डोळ्यांची..... कधी कळली का नाही तुला ? भाव माझ्या मनाचे...... कधी उमजले का नाही तुला ? शब्द माझ्या कवितेचे..... कधी समजले का नाही तुला ? का तुला... कळते भाषा.... फक्त ओठांचीच ??? जी... मी... अजून..... वापरलेलीच नाही !! शिघ्रकवी वैद्य प्र.प्र. व्याघ्रसूदन २५ मे २००८ ६.१७ सायं

Wednesday, August 9, 2017

अनोळखी

अगदी असच ठरल होत अनोळखीच वागायच ! झालीच चुकून भेट जरी नजर चुकवून निघायच ! -प्र*

Thursday, October 13, 2011

जाती-पाती

इथे जाती-पातीची ही करतात शेती...
अनं.. माणुसकीला देतात मुठमाती !!
अश्याच आहेत इथल्या...चालीरीती..
इथे कुंपणांनाच वाटते शेताची भिती !!
-
प्र*
( अ ज ब ज ग )
11:09 PM 10/13/2011

मरणानुभव

मरणाच्या दारात, दररोज... उधारीच आयुष्य...... जगताना...
आतल्या आत, तीळ तीळ मरण्याचा.... अनुभव गुढ होता !
आणि जेव्हा मरण जवळ आलं....तेव्हा ही, त्या जीवनाला,
तीतक्याच प्रेमाने हसत बघण्याचा.....अनुभव गोड होता !!
-
प्र*
11:06 PM 10/4/2011

प्रेम काळजी

प्रेम करताना कोणाची तरी काळजी आपोआपच होते....
काळजी करताना प्रेम होत नाही असे क्वचितच होते !!
-
प्र*
11:04 PM 10/1/2011

न शि ब

हस्ततलावर नशिबाची रेख...
की ललाटावर सटवाईचा लेख ?
ग्रहतार्‍यांच गणिती ज्योतिष...
की पूजापाठाच देवाला अमिष ?

सत्य काय ? असत्य काय ?
कर्तृत्वाला नशिबाला चौकट !
देव काय ? मानव काय ?... इथे..
नशिबही नाही मिळत फुकट !!
-
प्र*
(अ ज ब ज ग)
10:04 AM 10/7/2011

फुलपाखरु

दिवसभर उडणारं.... हे फुलपाखरु...
आता दमले आहे...
निपचित...बिछान्यावर...पडलं आहे !!!
नाना रंगात...स्वतःला ही विसरणारे ते....
आता स्वतःतच रमले आहे !!
कारण ही तसेच आहे....
त्याचे मोहाचे पाश आता तुटले आहे....
त्याच्या आवडत्या रातराणी ने ....
आज त्याला दूर लोटले आहे..!!!
खरचं...तीला भेटण्याच्या आशेवर...
दिवसभर अविरत उडणारे ...फुलपाखरु...
अंधारात एकटेच पडले आहे !....
कोणालाही न दिसता.....मौन रडले आहे !!
ज्या मधुगंधासाठी काढला घाम....
त्यानेच त्याला आज छळले आहे !!
स्वतःतलाही न दिसे "राम"
असे काही तरी आज घडले आहे !!!
sk ppw
-
२ मार्च २००८ १२:११ प्रातः